This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*डीडीपीआय बसवराज नरतवाड लाज घेताना रंगेहात अटक*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डीडीपीआय बसवराज नरतवाड लाज घेताना रंगेहात अटक

जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणजेच डीडीपीआय बसवराज नरतवाड यांना 40 हजार रुपयांची लाज घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडले आहे त्यामुळे चक्क बेळगावचे डीडीपीआयच लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले आहेत. या वृत्तामुळे शिक्षण खात्यात खळबळ उडाली असून सर्वत्र याबाबतच चर्चा सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की विद्यानिकेतन चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेच्या परवान्याचे वार्षिक नूतनीकरणाचे काम प्रलंबित होते.

सदर काम करून देण्याच्या बदलण्यात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चा मुख्याध्यापकांकडे चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती त्यामुळे या मुख्याध्यापकांनी लोकायुक्तांकडे तक्रार नोंदविली होती.या नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत आज लोकायुक्तांनी डीडीपीआय बसवराज नलतवाड यांना चक्क रंगेहात चाळीस हजार रुपयांची लाच घेताना पकडले

कित्तूर तालुक्यात तुरमुरी येथे विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल आहे या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन पुरी यांनी लोकायुक्त विभागाकडे ही तक्रार केल्याने त्यांनी ही कारवाई केली असून डीडीपीआय बसवराज नलदवाड यांना रंगेहात पकडले आहे.

लोकायुक्तांनी पोलीस सापळा रचून ही कारवाई केली असून याबाबत लोकायुक्त तपास पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक उस्मान अवटी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now