बेळगावातील एपीएमसी मार्केट मध्ये आज दिवसाढवळ्या चोरी झालेली आहे. राजू डिकोस्टा हे खरेदी करता राजदीप ट्रेडर्स मध्ये गेले असता त्यांच्या दुचाकीच्या डिक्की मधील दोन लाख रुपये चोरट्याने लंपास केलेले आहेत.
ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. राजू डिकोस्टा यांनी एपीएमसी मार्केट मधून साहित्याची खरेदी केली होती पैसे भरण्याकरिता ते एपीएमसी मध्ये आले होते. ज्यावेळी ते दुकान मध्ये गेले असता अवघ्या दोन मिनिटातच चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड लांबविली.
त्यानंतर ते पैसे घेण्याकरिता दुकानाबाहेर आले असता डीक्की मध्ये पैसे नव्हते. म्हणून त्यानी सीसीटीव्ही फुटेज तपासला मी हे प्रकरण उघडकीस आले त्यांनी पोलिसांना यासंबंधी माहिती दिली आहे आता पोलीस या चोरट्याचा मागवा घेत आहेत .