बेळगांव:महात्मा फुले रोड, शहापूर येथील दानम्मा मंदिराच्यावतीने दानम्मादेवी मूर्ती प्रतिष्ठापना ३९ व्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार दि. २१ रोजी सकाळी – १०.१५ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. जी. ए. नागलीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. बसवेश्वर कल्याण मंटप टस्ट आणि केएलई रुग्णालय यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुरुवार दि. २२ रोजी सायंकाळी ५.३० वा. ३९ व्या वार्षिक उत्सवानिमित्त साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांतर्फे वचन प्रार्थना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रुद्राक्षीमठ नागनूरचे अल्लमप्रभू महास्वामी, प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मंगला अंगडी आदी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दि. २३ रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २.३० पर्यंत महाप्रसाद वितरण होणार असून ५.३० वाजता पालखी उत्सव होणार आहे. कन्नड साहित्य परिषदेच्या मंगल मेटगुड यांच्या हस्ते पालखी उत्सवाचे उद्घाटन होणार आहे