छत्रपती शंभूराजांचा 343 वा राज्याभिषेक सोहळा येत्या मंगळवारी 16 जानेवारीला 2024 रोजी साकाळी 6 वाजता बेळगाव येथील छत्रपती संभाजी राजे चौकात होणार असून, तो माजी आमदार अनिल बेनके हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण सोहळा समितीच्या वतीने छत्रपती संभाजी राजे चौकात विविध संकल्पनांच्या माध्यमातून शिवशंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले असून, धर्मवीर संभाजीराजे चौकाचे सुशोभीकरण करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या माजी आमदार अनिल बेनकेच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सुनिल जाधव श्रीनाथ पवार,प्रसाद मोरेच्या वतीने करण्यात आलं आहे.