बेळगांव:बालरोग व प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा विभागाने दंत शिक्षण विभाग, काहेरच्या केएलई व्ही.के दंत विज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 22 मार्च 2024 रोजी एक दिवसीय सीडीई कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ओंकार हरिदास यांचे अतिथी व्याख्यान झाले. पुण्यातील बालरोग दंतचिकित्सक ज्यांनी यशस्वी दंतवैद्यकीय सराव चालवण्याच्या रणनीती आणि बालरोग दंत काळजीमध्ये प्रभुत्व मिळवण्याच्या धोरणांबद्दल सांगितले.
जेथे त्यांनी बाल दंत सराव वाढविण्यासाठी युक्त्या आणि टिपांवर भर दिला. दुसरे अतिथी व्याख्यान मंगलोर येथील सुप्रसिद्ध सौंदर्यशास्त्रीय दंतचिकित्सक डॉ. अब्दुल रहिमन रमीझ यांचे हसू वाढविण्यावर दंतचिकित्सामधील सौंदर्यशास्त्राची कला या विषयावर मार्गदर्शन केले.ज्यांनी सौंदर्यशास्त्र व व्यक्तीचे एकूण स्वरूप सुधारण्यासाठी विविध उपचार पद्धती दाखवल्या. व्याख्यानांनंतर स्टेनलेस स्टीलच्या मुकुटावर हँड्स ऑन डेमॉन्स्ट्रेशन व डॉ. अब्दुल रहिमन रमीझ यांनी एस्थेटिक अँटीरियर कंपोझिट रिस्टोरेशन केले. कार्यक्रमाला दक्षिण कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध दंत महाविद्यालयातील 100 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अलका काळे , डीन सोनल बी. जोशी, दंतचिकित्सा विद्याशाखा, काहेरच्या केएलई व्हीके इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सचे प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी विविध विभागांचे प्रमुख, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न व पदवीपूर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक व बालरोग आणि प्रतिबंधक दंतचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. शिवयोगी एम. हुगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ.विद्यावती एच.पाटील यांनी वक्त्या डॉ. श्वेता कज्जरी यांचा परिचय करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रशेखर बाडकर व डॉ. निरज गोखले यांनी केले. डॉ.चैतन्य उप्पीन यांनी आभार मानले.