This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दूरशिक्षण केंद्राच्या वतीने बेळगांव येथे प्रवेश प्रक्रियेबाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दूरशिक्षण केंद्राच्या वतीने बेळगांव येथे प्रवेश प्रक्रियेबाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र मार्फत शैक्षणिक वर्ष 2023 – 24 साठी बी.ए.,बी.कॉम., एम.ए.(मराठी हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र) एम.कॉम.,एम.एस्सी व (गणित) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने बेळगांव येथील सीमा भागातील विद्यार्थी,गृहिणी,कामगार,शेतकरी यांच्यासाठी सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन,ओरिटल स्कूल जवळ बेळगाव येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी समन्वयक प्रा.डॉ.के.बी.पाटील उद्बोधन वर्ग घेणार असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे सचिव व बेळगांव महानगरपालिकेचे माजी महापौर श्री.मालोजी अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे खजिनदार श्री.प्रकाश मरगळे, सहा.प्रा.डॉ.सचिन भोसले,डॉ.चांगदेव बंडगर, डॉ.सुशांत माने,डॉ.मुफीद मुजावर यांच्या उपस्थितीत होणार आहे.तरी सर्व प्रवेश इच्छूक व अभ्यागत यांनी उदबोधन वर्गास उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now