आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांची व्यापक बैठक अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
17 जानेवारी हुतात्मा दिवस गांभीर्याने पाळावा व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सीमाभागातील नागरिकांना मुख्यमंत्री आरोग्य योजना व जोतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येणार होती पण कन्नड संघटनाच्या दबावखाली येत प्रशासनाने येत याला विरोध केला असून मराठी भाषिकांची सेवकेंद्रे कोणतीही पडताळणी न करता बंद पाडली आहेत हे निषेधार्थ असून वैद्यकीय सुविधा रोखणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून राबविणाऱ्या योजनांचा विरोध केला जाऊ नये अशी मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली.
तसेच महानगर पालिकेच्या वतीने कन्नड सक्ती राबविण्यासाठी व्यापारी परवाने रद्द करण्यासाठी कायदेशीर नोटीस दिली जात आहे त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ही सक्ती थांबवावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तरी ही मोहीम त्वरित थांबवावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
बैठकीला कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम,सिद्धार्थ चौगुले, वासू समाजी, सरचिटणीस श्रीकांत कदम,सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे,प्रतिक चंद्रकांत पाटील,नितिन गुंडप,महेश चौगुले,आशिष कोचेरी, महेश जाधव,रणजित हावळणाचे, मनोज पाटील, सौरभ जोशी, भालचंद्र पाटील,रितेश पावले, अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.