महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी गडहिंग्लज येथे युवासेना सचिव वरून सरदेसाई यांची भेट घेतली. शिवसेना कायम सीमावासीयांच्या पाठीशी खंबीर आहेच. पण कर्नाटक सरकार सातत्यानं आमची भाषा, संस्कृती सम्पवण्यासाठी रोज नवीन फतवे काढत आहे आणि महाराष्ट्र शासन काहीच करत नाही. यावर उद्धव साहेबांशी चर्चा करून आवाज उठवावा अशी विनंती केली.
सीमाप्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहेच उद्धव साहेबांशी चर्चा करून नक्कीच यावर आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी कोल्हापूरचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सूरज कणबरकर, रवी निर्मळकर, विनायक हुलजी, सचिन दळवी, डॉ.सतीश नरसिंग, युवा सेना तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर उपस्थित होते.