बेळगाव: ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नंदिहळी गावामध्ये राज्यसभा सदस्य श्री इराना कडाडी यांच्या अनुदानातून विठ्ठल बिरदेव मंदिर आवारामध्ये समुदाय भवन बांधण्यासाठी रुपये 5 लाख अनुदान मंजूर करण्यात आले आहे, त्यांचे भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला, याप्रसंगी बोलताना ईराना कडाडी म्हणाले मी राज्यसभा सदस्य असल्याने संपूर्ण राज्यांमध्ये आमच्याकडून अनुदानासाठी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, पण ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे आमदार नाहीत अशा ठिकाणी जास्त अनुदान देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे.
तरी याचा सदुपयोग जनतेने करून घ्यावा, अगदी कमी वेळामध्ये बांधकाम पूर्ण करून उद्घाटन व्हावे व जनतेला त्याचा उपयोग व्हावा याची खबरदारी गावातल्या जनतेने घ्यावी असे ते म्हणाले, प्रारंभी वाद्यांचा गजरात राज्यसभा सदस्य कडाडी यांना मिरवणुकीने कार्यक्रम स्तरी नेण्यात आले, याप्रसंगी *मन की बात* हा कार्यक्रम सुद्धा सार्वजनिक रित्या एकत्र ऐकण्यात आला याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, देसुर महाशक्ती केंद्रप्रमुख मारुती लोकूर, मंडळ सरचिटणीस बसवराज धमनगी, मंडळ चिटणीस चेतन अंगडी, मंडळ भाजपा कार्यालय कार्यदर्शी नारायण पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, संतोष अंगडी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच परिसरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते