बेळगांव ता,4. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य पुरस्कार विजेते मिस्टर इंडिया शरीरसौष्ठवपटूं प्रीतम चौगुले प्यारा ऑलपियानपदक विजेते संजीव हम्मंण्णावर , शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पूजन करण्यात आले दूष्टी धन्ना हिने उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यानंतर शालेय राष्ट्रीय फुटबॉल व हँडबॉल खेळाडू क्रीडापटू अभिषेक गिरीगौडर ,रेनिवार मालशोय,लिंगेश नाईक, ओरिना वायरम,स्वरूप हलगेकर, स्वयंम काकतकर आदित्य सानी, सिद्धांत वर्मा प्रीती भादुंर्गे, भूमिका कुलकर्णी, सलामी आपटो प्रियांका पाटील, या खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानावरती फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा ढवळे हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली याप्रसंगी पाहुण्यांनी विद्यार्थी जीवनात खेळाचे व अभ्यासाचे महत्त्व विशद करून ध्येय समोर ठेवल्यास यश नक्कीच मिळते असे सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रीतम चौगुले व संजू हम्मंण्णावर यांच्या हस्ते निरंज सावंत, शिवकुमार सुतार, यश पाटील, योगेश सावगांवकर यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, सविता पाटणकर, किरण पावसकर ,आशा कुलकर्णी, गीता वर्पे, श्रद्धा मेडके, धनश्री सावंत, रूपाली जोशी, प्रेमा मेलीनमनी, सुप्रिया हिंदोळे, विशाल बेर्डे, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, लक्ष्मी पेडणेकर, अश्विनी लोहार ,रूपा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्वी जोशी तर आराहन हणमंण्णावर यांनी आभार मानले.