|| रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी ||
शांताई वृद्धाश्रम दुसरे बालपण बामणवाडी बेळगाव
शांताई वृद्धाश्रम दुसरे बालपण बामणवाडी बेळगाव
शांतीचा वृद्धश्रमाचा 25 व्या वर्धापनानिमित्त श्री संत वारकरी संघ बामणवाडी ग्रामस्थ व शांताई वृद्धाश्रम यांचा वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शांताई वृद्धाश्रमा बद्दल थोडक्यात : सर्व धर्मीय समाजातील एक वृद्धाश्रम बेळगाव ग्रामीण भागात असावे असे स्वप्न शांताई वृद्धाश्रमाचे चेअरमन श्री. विजय पाटील यांच्या मनात आले. त्यासाठी बामणवाडी येथे जागा खरेदी करण्याचा निश्चय झाला. श्री. विजय पाटील व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य सर्व संचालक मंडळ यांनी बेळगाव – गोवा महामार्ग बामणवाडी येथे एक जागा खरेदी करून १९९८ साली. शांताई वृद्धाश्रम दुसरे बालपण असे नामकरण देऊन वास्तू उभी केली. अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीतून शांताई वृद्धाश्रमाचा परिसर सुशोभित केला व त्याचा बेळगाव तालुक्यातील वृद्धांना लाभ झाला. सध्या शांतता वृद्धाश्रमाचे संचालक मंडळ व सेवेकरी वृद्धाश्रमातील वृद्धांची सेवा करत आहेत.
आज वृद्धाश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून त्या निमित्ताने एक दिवसाचा सिद्धेश्वर मंदिर पिरणवाडी ते शांताई वृद्धाश्रम बामणवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर संत पूजन, माउलींच्या आश्वाचे रिंगण, हरिपाठ किर्तन, महाप्रसाद, असा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक श्री. संत वारकरी संघ परिवार व बामणवाडी ग्रामस्थ पंचक्रोशीतील वारकरी हरिभक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी या परिसरातील सर्व हरिभक्त वारकरी मंडळी कार्यक्रमाला आवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी विनंती शांताई वृद्धाश्रमाच्या व श्री. संत वारकरी संघ परिवार बामणवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे .
कार्यक्रमाची रूपरेषा :
रविवार दि. 9 एप्रिल 2023
* सकाळी ठीक ९ ते 11 श्री सिद्धेश्वर पूजन वसंत बालिगा यांच्या हस्ते होणार आहे.
* श्री संत ज्ञानेश्वर माऊली दिंडीचे पूजन श्री. भगवान वाळवेकर यांच्या हस्ते
* पिरानवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती पूजन श्री. महेश देसाई यांच्या हस्ते
* वीर संगोळी रायण्णा मूर्ती पूजन दीपक गुडणहट्टी यांच्या हस्ते
* माउलींच्या अश्वाचे पूजन पराग चिटणीस यांच्या हस्ते
* ब्रह्मलिंग देवस्थानचे पूजन कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते
* दिंडी पालखीचे स्वागत व पूजन श्री. विजय मोरे यांच्या हस्ते
* गणेश पूजन श्री सिद्धार्थ हुंदरे यांच्या हस्ते
* श्री विठ्ठल रुक्माई पूजन नागेश चौगुले यांच्या हस्ते
* श्री ब्रह्मध्वज पूजन अजित लोकूर यांच्या हस्ते
* श्री संत ज्ञानेश्वर पूजन मचाडो यांच्या हस्ते
* श्री. संत तुकाराम महाराज पूजन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते
* श्री एकनाथ महाराज पूजन डॉ. एस. रोहित राज यांच्या हस्ते
* श्री संत नामदेव महाराज पूजन विनायक लोकूर यांच्या हस्ते
* श्री संत चोखामेळा पूजन अजित हुक्केरी यांच्या हस्ते
* श्री संत कबीरदास पूजन गोपाळ कुकडोळकर यांच्या हस्ते
* श्री गौतम बुद्ध मूर्ती पूजन राजेंद्र बंन्सूर यांच्या हस्ते
* शेख मोहम्मद पूजन सुनील देसाई यांच्या हस्ते
* तुळसी पूजन विद्या मदन पाटील यांच्या हस्ते
* गोल रिंगण पूजन श्री राजू पाटील (इन. बेलगाम न्यूज) यांच्या हस्ते
* उभे रिंगण पूजन श्री हजारे किचन यांच्या हस्ते
* महाप्रसाद पूजन श्री ऍलन मोरे यांच्या हस्ते
* हरिपाठ पूजन श्री संतोष ममदापूर यांच्या हस्ते आणि कीर्तन पूजन श्री मारुती प्रशांत पाटील यांच्या हस्ते असा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून
रविवार दि ९ एप्रिल हा संपूर्ण दिवस विठू माऊलीच्या गजराने व टाळ मृदूंगाच्या साथीने हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये खास करून मी कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून पारंपारिक पंढरपूर दिंडीचे दर्शन व गोल रिंगण दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य लाभावे. अशी विनंती करण्यात आली आहे.
आपले ¬
श्री. विजय मोरे
कार्याध्यक्ष, शांताई वृद्धाश्रम ( दुसरे बालपण ) बामणवाडी व माजी महापौर, बेळगाव .