सेंट्रल हायस्कूल मध्ये बालदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या दिवशी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून त्याचे स्टॉल लावण्यात आले या स्टॉलचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री हजबे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन करण्यात आले व त्यानंतर नेहरूंच्या जीवनावर आधारित शिक्षक व विद्यार्थ्यांची भाषणे झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी लावलेल्या वेगवेगळ्या स्टॉलमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावून आपल्या पदार्थांची विक्री केली आणि त्यातून नफा कसा मिळवावा याचे धडे घेतले.
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला काही विद्यार्थ्यांनी तर दिवाळीच्या फराळाचे स्टॉल लावले होते त्यांच्याकडे जोरात खरेदी झाली अशा प्रकारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून एक वेगळी प्रथा या शाळेने सुरू केली याबद्दल या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.