बेळगाव जिल्हा वाल्मिकी( रामोशी बेरड बेडर) समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करून वाल्मिकी नायक समाजाचा पर्यायी बेडर शब्द इतर हा अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
बेरड बेडर नायक आणि वाल्मिकी हे 1991 ला अनुसूचित जमातीत यादी समाविष्ट केले आहेत परंतु मुख्यतः बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील इतर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्याच्या शालेय नोंदीमध्ये बेडर हा उल्लेख आढळला आहे.
त्यामुळे या समाजाच्या मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाल्मिकी नायक समाजाचा पर्यायी शब्द बेडर हा अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.