This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः एक नोव्हेंबरला बेळगावला जावे: खासदार संजय राऊत*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः एक नोव्हेंबरला बेळगावला जावे: खासदार संजय राऊत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला मी बेळगावच्या लढ्यात लाटा काट्या खाल्ल्या असे नेहमी सांगत असतात त्याचबरोबर बेळगावच्या आंदोलनात आपण तुरुंग वास देखील भोगला आहे बेळगावकरांचे दुःख मी जवळून आणले आहे .असे नेहमी म्हणत असतात त्यामुळे आता त्यांनी एक नोव्हेंबरला काळ्या दिनी बेळगावात जावे आणि सीमा वासियांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन आज मुंबईत शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक खासदार आणि तीन मंत्र्यांना बेळगाव मध्ये प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यानंतर महाराष्ट्रातील नेते मंडळाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी देखील ही प्रतिक्रिया दिली आहे जर तीन मंत्र्यांनी खासदार जाऊ शकत नसतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावला जावं असे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात उद्या एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळण्यात येतो तसेच महाराष्ट्रात देखील अनेक जण काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्याफिती बांधून काळा दिवस साजरा करत असतात. महाराष्ट्रातील तीन मित्रांना आणि 1000 यांना बेळगाव मध्ये बंदी घातली असल्याने कशाच्या मुख्यमंत्र्यांनी बळवावेत जावे असे ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

महाराष्ट्रातील तीन मंत्री दीपक केसरकर शंभूराजे देसाई चंद्रकांत पाटील आणि एक खासदार धैर्यशील माने यांना 31 ऑक्टोबर सायंकाळी सहा पासुन ते नोव्हेंबर दोन सकाळी अकरा पर्यंत बेळगावात येण्यास बंदी आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now