श्री ज्योतिर्लिंग देवस्थानाची चव्हाट गल्ली ची बसवानाचे सासानकाठी बसवण कुडची यात्रेला प्रस्थान
सालाबाद प्रमाणे बसवण कुडची यात्रा निमित्त श्री ज्योतिर्लिंग देवस्थान चव्हाट गल्ली देवघरामधून बसवांना ची सासानकाठी व पालखी बसवण कुडची गावात जात असत. गावातील गणेश मंदिर येथे आल्यानंतर गावचे मानकरी व पुजारी , वाजंत्री सासनकाठी ची पूजा करून स्वागत करण्यात येते व त्यानंतर वाजत गाजत मुख्य मंदिर येथे पोहोचते. रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम या गावात होत असत त्या धार्मिक विधीमध्ये प्रत्येक कामात ही सासनकाठी सहभाग होते.
मंगळवार सायंकाळी इंगळ्या चा कार्यक्रम पार पडणार असून इंगळ्या झाल्यानंतर ही सासनकाठी परत बेळगाव ला प्रस्थान होते . यात्रा करून आल्यानंतर चव्हाट गल्ली येते प्रत्येक घरातील आरती व पूजा करून ही पुन्हा देवघरात सांगता होते.