संकल्प दिवस कार्यक्रम कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ, बेळगाव शहर घटक वतीने बुधवार दिनांक 7/ 2 /2024 रोजी श्रीमती चंपाबाई भोगले गर्ल्स हायस्कूल शहापूर बेळगाव येथे साजरे करण्यात आले. स्वामी विवेकानंद व सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत हसबे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य साबण्ण तळवार व कर्नाटक उत्तरप्रमुख अशोक शिंत्रे उपस्थित होते.
व्यासपीठावर कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यदर्शी आर पी वंटगोडी, जिल्हा महिला प्रमुख डॉ.नवीना शेट्टी गार उपस्थित होते. बौद्धिक मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. नीता एस राव उपस्थित होते. हायस्कूलचे प्रवर्तक मंडळाचे अध्यक्षा श्रीमती यू वि श्रुती व शाळेचे मुख्याध्यापक वाय एम वग्गण्णवर हे सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या प्रार्थना गीताने सुरू झाले. प्रस्ताविक भाषण डॉ. नवीना शेट्टीगार यांनी केले. शहर घटक चिटणीस एम बी अंगडी यांनी स्वागत व परिचय करून दिले. डॉ नीता एस राव यांनी कर्तव्य बोधाचे वाचन केले. व आपले विचार व्यक्त करत ते म्हणाले शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम तळपाया व्हावे, स्वामी विवेकानंदांचे आदर्श व सुभाषचंद्र बोस यांची शिस्तता विद्यार्थी वर्गाने पाळावे असे ते म्हणाले.
ह्यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने साबण्ण तळवार यांनी आपले विचार व्यक्त केले. शहर घटक अध्यक्ष संजीव कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास गावडे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर या कार्यक्रमात कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेळगावचे चिटणीस उमेश कुलकर्णी उपस्थित होते.एन् ओ डोणकरी, वामन कुलकर्णी, पी ओ धामणेकर, सचिन कुडची, प्रिया सायनेकर, नायक मॅडम, मंजुनाथ गोलीहळ्ळि, एम के पाटील व विद्यार्थिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.