बसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या मध्ये जागेवरून वाद झाला.प्रारंभी दोन्ही महिलांनी एकमेकावर तोंडसुख घेतले आणि नंतर एकमेकांना चप्पलने मारहाण केली.
दोन महिला प्रवाशांच्या धावत्या बसमधील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. बसमध्ये बसण्याच्या जागेवरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला.वादाचे पर्यवसान शिवीगाळ करण्यात झाले.नंतर सीटवर बसलेल्या महिलेने चप्पल काढून मारायला सुरुवात केली.नंतर दुसऱ्या महिलेने देखील चप्पल काढली.या साऱ्या गोंधळात एका महिले बरोबर असणारी लहान मुलगी मध्ये पडली पण बिचारीला चप्पल बसली.
अखेर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून बसमधील पुरुष प्रवाशांनी दोन्ही महिलांना शांत केले.सध्या कर्नाटकात शक्ती योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास करता येतो.त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून वारंवार महिलांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.