This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*’बोगी हॉटेल’ रविवारपासून सेवेत : शनिवारी संध्याकाळी भव्य उद्घाटन*

*’बोगी हॉटेल’ रविवारपासून सेवेत : शनिवारी संध्याकाळी भव्य उद्घाटन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीतील एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखले जाणारे बोगी हॉटेल शनिवार दि. ३० पासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल होत आहे. नैऋत्य रेल्वेचे चौथे आणि बेळगावातील पहिले चोवीस तास हॉटेल ठरणार आहे. मॅग्नम फूड्स कंपनीच्या माध्यमातून या हॉटेलचा कार्यारंभ होणार आहे.

शनिवारी सायंकाळी सहा वाजता भव्य उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ, खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आणि रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बोगी हॉटेलचा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे. रेल्वेची सेवा सातत्याने चोवीस तास सुरु असते. दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेस्थानक आवारातच अतिशय दर्जेदार आणि चोवीसतास खाद्यपदार्थ मिळावेत आणि तेही रेल्वेच्या सजवलेल्या बोगीतच खाता यावेत अशी संकल्पना आहे. काही महत्वाच्या शहरातील रेल्वे स्थानकांवर ही सोय उपलब्ध करण्यात आली असून त्यामध्ये बेळगाव शहराचाही समावेश झाला आहे.

विशेष म्हणजे या बोगी हॉटेलची व्यवस्था मुख्य रेल्वेस्थानकापासून बाहेर अर्थात प्रवेशद्वारातच असल्याने बाहेरील खवय्येसुद्धा येथील पदार्थांचा चोवीस तास लाभ उठवू शकणार आहेत. तशी सर्व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सर्वप्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन प्रकार, स्नॅक्स आयटम, बिर्याणी तसेच इंडियन, चायनीज आणि काँटिनेंटल आयटम्स चाखायला मिळणार आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
शनिवारी उद्घाटनानंतर, बोगी हॉटेल रविवार दि. ३१ पासूनच खाद्यपदार्थांसाठी उपलब्ध होईल आणि नवीन वर्षात बेळगावच्या खाद्यप्रेमींसाठी ही एक अनोखी भेट असणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24