अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या डिव्हाईन हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशनच्यावतीने २८ जानेवारी रोजी गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान जीवनदान असून यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतो या ब्रीद वाक्यामार्फत रक्तदानाची जागृती निर्माण करत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी ९. ०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत हा शिबीर सिद्वेश्वर मंगल कार्यालय, काकती (ता.बेळगाव) येथे होणार आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी आपली उपस्थिती दर्शवून हा शिबीर यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता संपर्क करा 97406 31555, 9449150894 या क्रमांकावर.
D Media 24 > Local News > *उद्या हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीर*