दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी येथील कुमार गंधर्व कलामंदिर एस, पी, आॅफिस रोड बेळगाव येथे कराटेची ब्लॅक बेल्ट परीक्षा पार पडली. बेळगाव जिल्ह्याचे मुख्य परीक्षक श्री. गजेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आले.
वचना बसवराज देसाई ही गेल्या 12 वर्षापासून छत्रपती शिवाजी नगर येथील कराटे क्लासमध्ये सतत सराव करित होती. तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली.
तरी आज या कठीण परिश्रमातून इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते वचना देसाई हीला ब्लॅकबेल्ट , प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी पालक श्रीमती. सुनिता बसवराज देसाई , श्री. रमेश देसाई आणि श्रीमती. गीता देसाई यांना सुध्दा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करण्यात आला.
तसेच तिचे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित मुख्य अतिथी म्हणून
➡️श्रीमती विद्यावती भजंत्री (डेप्युटी डायरेक्टर कन्नडा आणि कल्चर डिपार्टमेंट)
➡️श्री. जे. एम. कालिमीर्ची (सी. पी. आय. माळमारूती पोलिस स्टेशन)
➡️श्री. जावेद मुशापुरी (सी. पी. आय, के. एस.आर.पी प्रशिक्षण केंद्र)
➡️श्री. अनंत कुमार ब्याकोड, (काँग्रेस लीडर,कर्नाटक युवा वेदीके अध्यक्ष)
➡️ श्री. संदिप जिरगॅल (नगर सेवक, हनुमान नगर बेळगाव)
➡️ श्री. गजेंद्र काकतीकर (बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष)
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती , विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार, दीपिका भोजगार , विनायक दंडकर, परशराम नेकनार, रतिक लाड, कृष्णा देवगाडी , सौरभ मजुकर, श्रेया यळ्ळूरकर , अनुज कोळी, आदित्यराज यादव, कृष्णा जाधव, संजीव गस्ती आणि संतोष तेलंग
यांनी विशेष परिश्रम घेतले…