This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*श्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा*

*श्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा

दिनांक 25/09/2023 रोजी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कल्लेहोळ येथे श्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव म्हणाले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन चरित्र पाहता हुशार विद्यार्थी तत्त्वनिष्ठ प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होणारे , महाविद्यालयामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शून्य ऑर्गनायझेशन स्थापन करून पाठीमागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचे विचार आणि प्रयत्न म्हणजे सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी त्यांची विचारसारणी होती संघाचे प्रचारक ते जनसंघाचे अध्यक्ष पर्यंत त्यागमय जीवन ते जगले, अंत्योदय चा संकल्प त्यांनी केला .

आपल्या देशामध्ये शेवटच्या व्यक्तीचासुद्धा उद्धार झाला पाहिजेत अशी आमची राजकीय व्यवस्था असावी हे विचार त्यांनी मांडले, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुळगा ग्रामपंचायत अध्यक्ष श्री रमेश खन्नुकर हे होते, याप्रसंगी हिंडलगा महाशक्ती केंद्र प्रमुख अनिल पाटील, नारायण झंगरूचे व अमोल जाधव यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर उचगाव महाशक्ती केंद्र सहप्रमुख गणपतराव देसाई, मंडळ उपाध्यक्ष डॉ. उमेश शिंदोळकर, यल्लाप्पा पाटील, पवन देसाई, गुणवंत सुतार, बाळू चांदीलकर, सुळगा शक्ति केंद्रप्रमुख बाळू पाटील, हिंडलगा शक्ती केंद्रप्रमुख विलास तशिलदार, अजित हलकर्णी, मंडळ कार्यालय प्रमुख नारायण पाटील आदींसह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24