This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*बिरदेव यात्रेस उत्साही वातावरणात प्रारंभ*

_upscale
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बिरदेव यात्रेस उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.यात्रेच्या पहिल्या दिवशी मानाच्या अश्वासह पालखी मिरवणूक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली.यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गावातील बिरदेव मंदिर पासून अश्व, पालखी मिरवणूक सुरू झाली. आंबील कलश घेऊन महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. पालखी मिरवणूक हालसिद्धनाथ नगर येथील बिरदेव मंदिरात आल्यानंतर मानकरी व धनगर बांधव यांच्या उपस्थितीत कर बांधण्यात आली.यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, मेवा मिठाई, हॉटेल, नारळ, साखर, कापूर, भेळ आईस्क्रीम आदीची दुकाने थाटण्यात आली आहेत.ग्रामपंचायत सदस्य सुनील कागले यांनी 140 किलोचा झेंडूच्या फुलाचा हार अर्पण केला.पाच दिवसात ढोल वादन वालंग, पहाटे पालखी सबिना, पहिली भाकणूक,

भरयात्रा, विविध शर्यती, महानैवेद्य, ढोल वादन वालंग पहाटे पालखी सबिना, कृष्णात ढोणे महाराज यांची मुख्य भाकणूक होणार आहे.बुधवार तारीख 8 रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, 9 वाजता विविध शर्यती, दुपारी 4 वाजात पालखी सबिना व यात्रेची सांगता होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now