शनिवारी वरेरकर मधे बिन्दु नाद कलातीत’
बेळगाव येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात शनिवार दि. 23 रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘बिन्दुनादकलातीत’ हा नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे.
सुप्रसिद्ध साहित्यकार मदेश एलकुंचवार यांच्या आत्मशोधावर आधारित हे अभिवाचन सादर करीत आहे, ‘शब्दवेध, पुणे या प्रयोगाचे संपादन, दिग्दर्शन गायक अभिनेते चंद्रकांत काळे यानी केले आहे.
त्यांच्या सहहर्षद राजपाठक या रंगकर्मीचाही सहभाग आहे.
‘अमृतगाथा’, प्रीतरंग, साजणवेळा, शेवंतीचे बन, आख्यान तुकोबाराय अपरिचित पुलं असे एकाहून एक दर्जेदार कार्यक्रम सादर केलेल्या ‘शब्दवेध’ या संस्थेस ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सुमारे सव्वा तास चालणारा हा कार्यक्रम वरेरकर नाट्य संघ, लोकमान्य ग्रंथालय, वाङ्मय चर्चा मंडळ, मराठी भाषा प्रेमी मंडळ आणि विश्व मराठी परिषद (बेळगाव शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. कार्यक्रम सर्वाना खुला आहे.