This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक रॅली*

*भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक रॅली*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरात आज भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली यावेळी बाईक रॅली विविध दलित संघटनांच्या वतीने काढण्यात आली. प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना दलित नेते मललेश चौगुले म्हणाले की नव्या वर्षाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून करत आहोत. आजच्या दिवशी आपल्या देशातील ऐतिहासिक असे भीमा कोरेगाव युद्ध झाले होते.

या युद्धाला आज 2600 वर्षे पूर्ण झाली आहेत यानिमित्त भीमा कोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमास संपूर्ण देशासह विश्वातुन लाखो भीमसैनिक हजेरी लावली आहे.पेशव्या विरुद्ध 31 डिसेंबर रोजी रात्री भीमा कोरेगाव युद्ध झालं त्या युद्धाचे स्मरण आज देखील केले जाते त्या अनुषंगाने आम्ही शहरात आज विविध दलित संघटनांच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन केले आहे अशी माहिती दिली.

त्यानंतर ही बाईक रॅली किर्लोस्कर रोड मार्गे रामदेव गल्ली अशा विविध मार्गावरून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे या रॅलीची सांगता करण्यात आली त्यानंतर आंबेडकर उद्यान येथे सभा घेण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24