This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*घरगुती सिलेंडर मध्ये होत आहे मोठी चोरी*

D Media 24

घरगुती सिलेंडर मध्ये होत आहे मोठी चोरी

व्यवसायिक सिलींडरच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे व्यवसायिक प्रतिष्ठानांनी घरगुती सिलींडरचा म्हणजे 14.2 किलोच्या सिलींडरचा सर्रास वापर सुरू केला आहे. काही ठिकाणी तर चक्क 19 किलोच्या व्यवसायिक सिलींडरमध्ये 14.2 किलोच्या सिलींडरमधील गॅस पलटी करण्याचेही प्रकार होत आहेत. एवढेच कशाला वाहनांमध्येही सर्रास घरगुती सिलींडरचा वापर होऊ लागला आहे. हे अत्यंत गंभीर असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत असून स्फोट आणि आगीचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे ग्राहक दक्षता कल्याण फौंडेशन ने जागृती अभियान आयोजित केले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ते म्हणाले की सरकारी ऑयल कंपन्या आणि एलपीजी वितरक यांनी संगठीत रॅकेट चालविण्याऱ्या समाज कंटक लोकांना पाठीशी घातले असून शासनाने या विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन “ग्राहक दक्षता कल्यान फॉउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

ग्राहक दक्षता कल्याण फॉउडेंशन या संस्थेच्या माध्यमातून लोक जागरणाची एक देशव्यापी चळवळ सुरू करण्यात आली असून या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग एकत्रित केला जात आहे. या विषयावर अधिक माहिती देताना नितीन सोळंके यांनी सांगितले की या सर्व गैरप्रकाराला कारण म्हणजे काळाबाजार करण्याऱ्या लोकांना थोडे जास्त पैसे दिले तर बाजारात घरगुती सिलींडर अवैधरित्या सहज उपलब्ध होत आहे. तर काही गॅस एजन्सीज डमी ग्राहकांच्या नावाने नोंदणी करून तेल कंपन्यांकडून जास्तीचे सिलींडर घेत काळाबाजार करीत आहे.

एकीकडे सिलींडरच्या किंमती वाढत असल्यामुळे सर्वसामान्य माणूस आणि गरीब लोक काटकसर करून सिलींडर वापरत आहे. सध्या एक कुटुंब दोन ते तीन महिने एक सिलींडर वापरत आहे. तेल कंपन्यांनी मार्केटिंगचा नवा फंडा वापरत ग्राहकांचे आटो बुकिंग च्या नावावर वितरकांच्यामाध्यमातून ग्राहकांना गॅस सिलींडर पोहोचविणे सुरू केले आहे. पण ते सिलींडर बुक केलेले नसल्यामुळे गरज नसल्यास ग्राहक घेत नाहीत. अश्यावेळी ते सिलींडर ब्लॅक मार्केटमध्ये अवैध पणे विकले जाते. अश्या पद्धतीने अनेक गॅस एजन्सीज सर्रासपणे सिलींडरचा काळाबाजार करीत असुन यात एक संगठीत रॅकेट ठिक ठिकाणी सुरू आहे. याचे जाळे देशात सर्वत्र पसरले असून हा गंभीर विषय दिवसेंदिवस वाढत आहे.

सहजपणे गॅस पलटिचा व्यवसाय चालुन थोड्या पैश्यांसाठी स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून एलपीजी (गॅस) वाहनांमध्ये भरला जात आहे. एका टिल्लू पंपाच्या सहाय्याने गॅस सिलींडरमधून एक अत्यंत साधारण नळीद्वारे गॅस वाहनांमध्ये भरला जातो. सर्वांत गंभीर म्हणजे किती गॅस भरला आहे हे मोजण्यासाठी विजेवर चालणारे मोजमाप यंत्र (इलेक्ट्रानिक काटा) वापरले जाते. घरगुती वापराचे १४.२ किलोचा एलपीजी गॅस वाहनांमध्ये भरला जाणे, हे अत्यंत धोक्याचे आहे. कुठल्याही क्षणी सिलींडरचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. घरगुती सिलींडरचा अवैध वापर केल्यास कारावास व दंडाची तरतूदही कायद्यात आहे. पण सरकारी ऑयल कंपन्याच्या अधिकृत विक्रेत्यांच्या छत्रछायेखाली फोफावलेले संगठीत रॅकेट आज समाजासाठी एक आव्हान ठरत आहे.

आटोरिक्षा, कार व इतर वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती सिलींडर वापरला जातो तो जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली घरगुती सिलींडर जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडले जाते. त्यावर सरकारकडून सब्सिडी ही दिली जाते. शिवाय व्यवसायिक सिलींडरच्या तुलनेत घरगुती सिलींडरची किंमत कमी असते. पण असे असले तरीही वाहनांमध्ये अश्या पद्धतीने घरगुती एलपीजी भरणे भविष्यात महागाचे पडू शकते. घरगुती सिलींडर हे स्वयंपाकाच्या उद्देश्याने तयार करण्यात येते. त्यामुळे कमी दाबाने वाहनांच्या पिक-अपवर परिणाम होतो. तसेच वाहनांच्या एलपीजी कीटमध्ये कार्बन जमा होऊन त्याचा थेट परिणाम इंजीनवर पर्यायाने स्फोट / ब्लास्ट होण्याची शक्यता असते. असे पत्रकार परिषदेतसांगितले असून याबाबत जनजागृती देखील करणार असल्याची माहिती त्यानी दिली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply