This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*लवकरच बेळगावकरांना करता येणार “अंबारी डबलडेकर” बस मधून प्रवास*

*लवकरच बेळगावकरांना  करता येणार “अंबारी डबलडेकर” बस मधून प्रवास*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना आता लवकरच अंबारी डबलडेकर बस मधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. अंबारी ही बस बेळगाव मध्ये दाखल झाली असून प्रवाशांना आता अंबारी डबल डेकर मधून प्रवास करण्याकरिता थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत.

कर्नाटक राज्य पर्यटन खात्याने म्हैसूर येथे अंबारी डबल डेकर बस सुरू केली आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये दाखल झाली असून ही बस बेळगाव ते सौदती तेथील यल्लामा डोंगर या मार्गावर सुरू करण्याचा विचार आहे

याबाबत आवश्यक ती चाचणी करण्यात येत असून पर्यटन खात्यातील अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच या बस सेवेला प्रारंभ होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अंबारी डबल डेकर बस ही जवळपास 19 फूट असून बस वरील टपावर देखील आसन व्यवस्था आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविले आहेत.

येत्या दोन दिवसात म्हणजेच एक डिसेंबर नंतर या बसला पर्यटन खात्यातील अधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील दाखवून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.अंबारी डबल डेकर बस ही सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळात सुवर्ण विधानसभेच्या आवारात सेवेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्याही बस मध्यवर्ती बस स्थानक येथे थांबविण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24