महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या आश्रयाखाली विजयदुर्ग बीच येथे स्पर्धा नुकतीच यशस्वी त्या पार पडली. या स्पर्धेत वेदांत मिसाळे, पाखी हलगेकर आणि अरुण जाधव या बेळगावच्या जलतरणपटूंनी आपापल्या गटाचे सर्वात ‘जलद जलतरणपटू’ हे खास पारितोषिक पटकाविले.
या स्पर्धेत स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग (महाराष्ट्र) येथील श्री दुर्गामाता कला केंद्र आणि सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या ‘खुली सागरी जलतरण स्पर्धा -2024’ या समुद्रात पोहण्याच्या कठीण स्पर्धेमध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे.
तसेच बेळगावच्या अन्य जलतरणपटूंनी स्पर्धेत मिळविलेले एकंदरी यश (अनुक्रमे नांव, गट, अंतर, मिळविलेला क्रमांक यानुसार) पुढील प्रमाणे आहे. वेदांत मिसाळे : (गट 2) 2 कि.मी. प्रथम क्रमांक, पाखी हलगेकर : (गट 1) 1 कि.मी. प्रथम क्रमांक, अरुण जाधव : (35 ते 50 वयोगट) 2 कि.मी. प्रथम क्रमांक, अनिश पै : (गट 3) 3 कि.मी. दुसरा क्रमांक, अहिका हलगेकर : (गट 2) 2 कि.मी. तिसरा क्रमांक, स्कंद घाटगे : (गट 1) 1 कि.मी. तिसरा क्रमांक, विहान कोरी : (गट 2) 2 कि.मी. सहावा क्रमांक, श्रीदत्त पुजारी : (गट 2) 1 कि.मी. सहावा क्रमांक, आर्यवंश गायकवाड : (गट 3) 3 कि.मी. आठवा क्रमांक, युवराज बावडेकर : (गट 3) 2 कि.मी. दहावा क्रमांक. सागरी जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे वरील सर्व जलतरणपटू केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव बेळगाव येथे पोहण्याचा सराव करतात.
त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगांवकर व विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई- वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डा. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, श्रीमती माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.