बेळगाव:अॅडव्होकेट युनायटेड इलेव्हन पुणे महाराष्ट्र व पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वकिलांची राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव बार असोसिएशनचा संघ रवाना झाला. या संघाला ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील, अॅड. और पी. पाटील, अँड सी. बी. बागेवाडी यांनी शुभेच्छा दिल्या. अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी या खेळाडूंना प्रथमोपचार कीट दिले.
पुणे येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून १०० संघ दाखल होत आहेत. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या वकील संघालाही आमंत्रण देण्यात आले आहे. मागील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्यामुळे यावेळीही आमंत्रण देण्यात आले असून हा संघ रवाना झाला आहे.
शनिवारी अॅड. लक्ष्मण पाटील, अॅड. शिवाजी शिंदे, अॅड. रतन मासेकर, अॅड. शिवाजी पाटील, अॅड. गजानन जाधव, अॅड. कपिल वाळवेकर, अॅड. संतोष भागण्णावर, अॅड. गुरुराज पोतदार, अॅड. किरण पुजारी, अॅड. सुनील सकरी, अॅड. गदगय्या एणगीमठ यांच्यासह इतर खेळाडू रवाना झाले आहेत.