23 जानेवारी रोजी बेळगाव खानापूर रस्ता रोको आंदोलनकर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रशासंदर्भात ठोस निर्णय घेण्याकरिता येत्या 27 फेब्रुवारीला चलो मुंबईची हाक आज झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आली
तसेच या बैठकीत अनेक ठराव देखील मांडण्यात आले यामध्ये सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी झाड शहापूर येथे बेळगाव खानापूर रस्ता रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच या पार्श्वभूमीवर गावोगावी जनजागृती करण्याचे आवाहन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
त्याचबरोबर महिलांकरिता 29 जानेवारी रोजी बेळगाव मध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.
सदर बैठक ही मराठा मंदिर येथे पार पडली यावेळी या बैठकीत काही ठराव मांडण्यात आले आणि समितीच्या कार्यकारिणीची रचना करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले त्याकरिता प्रत्येक गावातून आपले नावे नोंदवावेत असे यावेळी बैठकीत कळविण्यात आले . यावेळी या बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य पदाधिकारी यांनी नेते उपस्थित होते.