विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याचे संघ रवाना.
बेळगाव ता,25. विजयपूर येथील सैनिक स्कूल शाळेच्या मैदानावर विजयपूर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित विभागीय प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघ रवाना झाले आहेत 25 व 26 ऑक्टोबर दरम्यान सदर स्पर्धा होणार असून होणार असून मुलींच्या 17 वर्षाखालील संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा शाळेतून कर्णधार प्रीती भांदुर्गे, रेनिवार मालशोय, खोबोरोज मालशोय, प्रियांका पाटील , संस्कृती भंडारी, सलामी आपटो, चैत्रा एमोजी, श्रद्धा ढवळे,चंदुरूग ,केजोंटी, किर्तीका लोहार. सर्व संतमीरा
सबिना लोबो. सृष्टी बेळगांवकर, बेला फर्नांडिस, जिया फर्नांडिस, ईषा झुंझवाडकर, शालीन कुलास, सर्व सर्वोदयस्कूल खानापूर.
हे खेळाडू संघ व्यवस्थापक श्रद्धा मेंडके हिच्या समवेत रवाना झाले आहेत.
तसेच प्राथमिक मुला- मुलींचा सेंट झेवियर्स व माध्यमिक मुलांचा सेंटपॉल संघ ही या स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.