This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

internationalLocal News

*हज यात्रेला जाताय सावधान……!!!*

*हज यात्रेला जाताय सावधान……!!!*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांची फसवणूक होऊ नये याकरिता आज पत्रकार परिषदेत हज फाउंडेशन कोल्हापूर तर्फे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी असे सांगितले की खाजगी टूर ऑपरेटर्स मार्फत यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंनी टाळण्यासाठी संबंधित खाजगी टूर ऑपरेटर कडे हज यात्रेसाठी जाण्याचा अधिकृत परवाना आहे की नाही याची सर्वप्रथम खातरजमा करावी ते सांगितले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की दरवर्षी सौदी अरेबियातील हजात्रेसाठी जाण्याकरिता देशातील 80% यात्री करून ची सोय भारत सरकारच्या हज कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने केली जाते.

त्याचप्रमाणे उर्वरित 20 टक्के यात्रेकरूंची हद यात्रेची सोय खाजगी टुरिस्ट कंपन्यांकडून केली जाते मात्र अलीकडे सौदी अरेबिया सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की अधिकृत परवाना असलेल्या टुरिस्ट कंपन्यांबरोबरच अन्य काही खाजगी टुरिस्ट कंपन्या बेकायदेशीर रित्या यात्रे करून ना जड्डा व रियाद येथे घेऊन जात आहे तेथून संबंधित यात्रेकरू पवित्र स्थळांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात परिणामी त्यांना अडकाटी केली जाते त्यामुळे पै ना पै पैसा जमा करून मेहनतीच्या पैशातून हज यात्रेला जाणार आहे जे आपले यात्रेकरू असतात त्यांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो.

मात्र यंदा सौदी अरेबिया सरकारच्या हज आणि उमरा मंत्रालयाने अशा पद्धतीने विनापरवाना आदिले जे लोक आहेत हज यात्रेच्या ठिकाणी आढळतील त्यांच्यासाठी 50 हजार सौदी रियाज म्हणजे भारतीय चलनात 11 लाख 5 हजार रुपये दंड सहा महिन्यांचा कारावास आणि दहा वर्षे सौदी अरेबिया मध्ये प्रवेश बंदी अशा शिक्षेचा कायदा लागू केला असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

त्यामुळे सौदी अरेबिया ला जाताना सर्व ती माहिती एकत्रित करून आणि खातर जमा करूनच जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना केले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24