भडकल गल्ली येथील बनशंकरी देवी यात्रोत्सवाला मंगळवार दि. २० पासून प्रारंभ करण्यात आला आहे. यानिमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आहे. करण्यात आले .” बुधवार दि. २१ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत महाआरती, गुरुवार दि. २२ रोजी पहाटे ६ ते सकाळी ८ पर्यंत महाअभिषेक व आरती, सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत दुर्गासप्तपदी पारायण, सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत महाआरती होणार आहे.
शुक्रवार दि. २३ रोजी पहाटे ६ ते सकाळी ८ पर्यंत महाअभिषेक व आरती, सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत नवचंडी होम, सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत महाआरती होणार आहे.शनिवार दि. २४ रोजी पहाटे ५ ते सकाळी ७ पर्यंत महाअभिषेक, पूजा, सकाळी ७ ते ८ पर्यंत ओटीं भरण्याचा कार्यक्रम, सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत पालखी मिरवणूक, दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद वितरण तर सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे.
भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बनशंकरी देवस्थान टस्ट कमिटीतर्फे करण्यात आले आहे