मंगळवार दिनांक 30 रोजी निपाणी येथील बेळगाव नाका मिरची मार्केट या ठिकाणी हॉटेल चालक-मालक यांनी राहिलेले अन्न प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून टाकतात या अन्नाच्या वासाने भटकी जनावरे कुत्री यांचे आरोग्य धोक्यात येत आहे याचाच एक आज प्रत्यय म्हणजे आज गोमतेने अन्नाची प्लास्टिक पिशवी खाल्ली होती गाईला श्वासनाचा खूप त्रास होत होता.
तडफडत होते याचे गांभीर्य ओळखून कार्यकर्त्यांनी डॉक्टर महेश पाटील यांना बोलावून इंजेक्शन सलायन औषधे देऊन गाईला वाचवण्यात यश मिळवणे या वेळी बजरंग दल चे कार्यकर्ते अतिश चव्हाण, अजित पारळे, अविनाश शिंदे, बबन निर्मले, स्वप्निल पावले , सतीश शिरगावे यांनी गोमतेला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले निपाणी व निपाणी परिसरामध्ये हॉटेल चालक-मालकांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता व असे उघड्यावर अन्न न फेकता त्याचा योग्य तो वापर करावा व भटकी जनावरे यांचे आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करू नये असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले व याचा प्रशासनाने ही गांभीर्याने विचार करावा अशी मागणी करण्यात आली.