This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सर्वोत्कृष्ट रायफल फायरर पदक देउन सन्मानित*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वोत्कृष्ट रायफल फायरर पदक देउन सन्मानित

रामगुरवाडी (ता. खानापूर) येथील बीएसएफ जवान अजय अनंत सुतार याने बंगळूर येथे झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) रायफल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत ११८ जवांनानी भाग घेतला होता.

अनंत हा २०२० मध्ये सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) भरती झाला. कष्टातून त्याने सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शालेय जीवनापासून सातत्याने विविध क्रिडा प्रकारात त्याने उत्तम कामगिरी केली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर महत्त्वाचा भाग असलेल्या रायफल फायर शूटिंग मध्ये त्याने चमक दाखवली.

दीक्षांत समारंभात त्याला बी एस एफ (बंगळूर) चे आयजी जॉर्ज मंजूरण यांनी सर्वोत्कृष्ट रायफल फायरर पदक देउन सन्मानित केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24