राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या,संगोळी रायण्णा फर्स्ट ग्रेड काॅन्स्टिट्यूएन्ट काॅलेज चे प्राध्यापक श्री आदिनाथ चंद्रनाथ उपाध्ये यांनी गणित शास्त्रातील फ्लूईड डायनामिक्स या शाखेमधुन “न्यूमरीकल स्टडी ऑफ स्लाइडर ॲन्ड स्क्विझ फिल्म बेअरिंग्स ल्युब्रिकेटेड वुइथ नाॅन-न्यूटाॅनिअन फ्लूईडस” या विषयावर गुलबर्गा विद्यापीठ ,कलबुर्गी येथे प्रबंध सादर केला.त्यांच्या
या प्रबंधासाठी गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना पी.एच.डी.(डाॅक्टरेट)पदवी प्रदान केली.
प्रा.आदिनाथ उपाध्ये यांच्या संशोधन कार्यासाठी कलबुर्गी जिल्ह्यातील ‘सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालय, सेडम येथील प्राध्यापक डाॅ काशीनाथ बिरादार यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले.