राजू पवार डान्स अकॅडमीच्या 31 व्या वर्धापन दिना निमित्त गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
बेळगाव सारख्या शहरात राहून नृत्य कलेचा अविष्कार आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अग्रगण्य असलेल्या आणि या कार्यक्रमाद्वारे अनेक सिने कलावंतांना बेळगाव मध्ये बोलवून कलागुणांचा आस्वाद बेळगावच्या रसिक प्रेक्षकांना देण्याचे बहुमोल असे कार्य राजू पवार डान्स अकॅडमीने केले आहे. तसेच आपल्या आपल्या कलागुणांबरोबरच सामाजिक
बांधिलकीचे संगोपन करण्यास हिरीरीने पुढाकार घेत आज आपल्या संस्थेचा 31 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतजी हे उपस्थित राहणार आहेत. असे आश्वासन मकर संक्रांति निमित्त डॉ. आदित्य सावंत, प्रोफेसर, आयुर्वेद कॉलेज, शिरोडा, गोवा यांच्या समवेत झालेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिल्याचे राजू पवार यांनी सांगितले.
सदरी कार्यक्रम कला अकॅडमी, पणजी, गोवा या ठिकाणी साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येणार आहे. सदरी कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
यांच्यासह अनेक गणनीय व्यक्ती, सीने कलावंत व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे असे राजू पवार डान्स अकॅडमी चे डायरेक्टर श्री राजू पवार यांनी जाहीर केले आहे.