*गोव्यातील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा खेळाडू*
गोवा येथील ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी बेळगाव येथील मुळचा चलवेनहट्टी सध्या राहणार सावर्डा गोवा येथील कपिल दिपक हुंदरे या खेळाडूंची निवड झाली आहे रतलाम- मध्य प्रदेश येथे होणाऱ्या १३ व्या राष्ट्रीय ज्युनियर मिस्टर इंडीया शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी कपिल यांची निवड झाली आहे.
यामुळे चलवेनहट्टी सह बेळगावकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे कपिल महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर हुंदरे यांचा पुतण्या आहे