This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*अंगणवाडी सहायिकेचे कापले नाक*

*अंगणवाडी सहायिकेचे कापले नाक*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडीतील मुलांनी मोगरीची फुले काढली म्हणून अंगणवाडी सहायिकेचे नाक कापल्याची घटना बेळगाव जवळील बसूर्ते गावात घडली आहे.या क्रूर घटनेचा समाजाच्या सर्वच स्तरातून निषेध होत असून महिला संघटनांनी हल्लेखोराला पकडुन कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

सुगंधा मोरे (५०) या अंगणवाडी मध्ये सहाय्यक म्हणून सेवा बजावतात.अंगणवाडी मधील मुलांनी बाजूच्या घराच्या आवारात असलेल्या मोगऱ्याच्या वेलीवरील फुले काढली म्हणून घर मालक कल्याण मोरे याने अर्वाच्य शिविगाळ करून कोयत्याने सुगंधा मोरे हीचे नाक कोयत्याने कापले.कोयत्याने हल्ला केल्यावर नाकातून रक्त वाहू लागून वेदनेने तळमळत होती.अखेर प्रसंगावधान राखून तेथील लोकांनी तिला उपचारार्थ इस्पितळात दाखल केले.

सध्या हल्लेखोर कल्याण मोरे फरार आहे.सुगंधा हिला वेदना असह्य होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.फुफ्फुसात रक्त गेल्याने सुगंधा हीची स्थिती चिंताजनक आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24