बेळगांव:आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटर सोमशेखर मस्तमरडी याने २२ हजारांची लाच मागितल्याने लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडल्याची घटना बेळगाव मध्ये घडली आहे. बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयात कार्यरत असलेल्या सोमशेखर यांनी विक्रीचे चलन देण्यासाठी २२ हजारांची मागणी केली.
अविनाश धामणेकर नावाच्या व्यक्तीने लाच घेतल्याची तक्रार लोकायुक्त ठाण्यात केली होती.त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी दुपारी12.30 वा.लोकायुक्त अधिकाऱ्यांनी नोंदणी कार्यालयावर भाडं टाकून सोमशेखर मस्तमरादी याला आज रंगेहात 22 हजाराची लाच घेताना अटक केली. लोकायुक्त एस पी हनुमंत रायाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.