बस स्थानकावरच एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भीमाप्पा डोनुर वय 76 असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
ही घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवन येथील बागेवाडी तालुक्यातील हुवीन हिप्परगी बस स्थानकाजवळ घडली आहे. बस स्थानकाच्या जाहिरात फलकासाठी लावलेल्या लोखंडी खांबाला गळफास घेऊन युद्धाने आत्महत्या केली आहे.
या घटनेची नोंद पोलिसांकात केली असून बसवन बागेवाडी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन तपास करून गुन्हा दाखल केला आहे.