बेळगावात आज पहाटे गजराजाने (हत्तीने )प्रवेश केल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. यावेळी स्थानिकांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि त्यामुळे आता हत्तीला पकडण्याचा वनविभाग प्रयत्न करत आहेत.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी के आणि शाहू नगरच्या नागरी वस्तीत हत्तीने प्रवेश केला.आणि बसव कॉलनी मधील वाहनांची मोडतोड केली नंतर हाच हत्ती अलतगा गावात दिसला आणि उचगाव गावाकडे निघाला.
हा प्रकार पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी हत्तीला पकडण्यास सुरुवात केली.
काही लोकांना पहिल्यांदाच त्यांनी धूम ठोकली तर काहींना हत्ती पाहण्याची उत्सुकता होती. तसेच हा हत्ती दोन दिवसांपूर्वी बेळगाव आणि महाराष्ट्र सीमेवरील कोवाड गावात दिसल्याचे सांगण्यात येत आहे. वन अधिकारी हत्तीला पकडून पुन्हा जंगलात सोडण्याच्या प्रयत्नात आहेत