This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*अमर येळळुरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारभ*

D Media 24

अमर येळळुरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारभ

 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार वकील अमर येळळुरकर यांच्या जाहीर प्रचाराचा शुभारभ आज कपिलेश्वराचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी सकाळी त्यांनी कपिलनाथाचे दर्शन घेतल्यावर कपिलनाथाचे विधिवत पूजन केले आणि या परिसरात प्रचार केला.

यावेळी उत्तर मतदार क्षेत्रातील मराठा समाजाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले तसेच त्यांचे औक्षण करून आपला जाहीर पाठिंबा समितीला दिला.

यावेळी त्यांनी कपिलेश्वर रोड तांगडी गल्ली रामा मेस्त्री अड्डा,महाद्वार रोड, संभाजी गल्ली, मराठा गल्ली,तानाजी गल्ली भांदूर गल्ली तशिलदार गल्ली,कांगली गल्ली पाटील गल्ली पाटील मळा शनि मंदिर या भागात प्रचार केला.

यावेळी संपूर्ण मराठा समाजाने आपला पाठिंबा महाराष्ट्र एकीकरण समितीला असल्याचे जाहीर केले.आणि येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रकीकरण समितीच्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करून आणून देऊ असा निर्धार केला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply