मातृभाषेची शाळा टिकवण्याकरिता माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार
माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एक पाऊल मातृभाषेच्या शाळा टिकविण्याकरिता पुढे टाकण्यात आले आहेत कणबर्गी सरकारी मराठी प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला देणगी स्वरूपात साहित्य देऊन मदत केली आहे. आणि शाळेचा वसा पुढे नेण्यास मदतीचा हात पुढे केला आहे.
1999 ते 2000 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मुला मुलींसाठी दहा हजार रुपयांपर्यंत पी टी व खेळाचे साहित्य देणगी स्वरूपात दिले आहेत. महेश सुळगे, पाटील ,सुनील मुतगेकर ,बसवंत कडोलकर ,श्रीकांत दड्डीकर ,अभिषेक मनसे ,गंगाधर कंग्राळकर ,श्रीधर मालाई ,किरण मुचंडीकर ,प्रशांत काळे यांनी आपापल्या परीने जमेल तितकी मदत मातृभाषा शाळा टिकविण्याकरिता केली आहे.