बेळगांव:चव्हाट गल्ली येथील प्रसिद्ध वकील व पंच ॲड. परशुराम ज्योतिबा नाईक ( पी जे नाईक) यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धपकालाने चव्हाट गल्लीतील राहत्या घरी गुरुवार दिनांक 25/01/24 रोजी रात्री 11.00 दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, जावई, सूना, नातवंडे व पणतवांडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे.देवदादा सासनकाठी चवाट गल्लीचे ते परम भक्त होते.