मराठा मंदिर येथे आयोजित महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आदर्श शाळा पुरस्कार व सामान्य ज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये 2023-24 सालातील पाच मतदारसंघातील आदर्श शाळा निवडण्यात आल्या होत्या. यामध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा येळ्ळूर या शाळेला सलग तिसऱ्यांदा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून बेळगाव दक्षिणमधून निवड करण्यात आले त्याचबरोबर सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले त्यांनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये कुमारी वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर हिचा दुसरा क्रमांक, श्रावणी राजेंद्र नायकोजी विभागून पाचवा, वैदेही संतोष पाटील विभागून सहावा, आचल प्रमोद देसुरकर विभागून आठवा, जिग्नेश रवींद्र गुरव विभागून नववा, जयदीप शिवाजी खेमनाकर व समर्थ संदीप मेलगे यांना उत्तेजनार्थ असे एकूण आठ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले आहे व आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. या बक्षीस वितरण समारंभ वेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, समस्या उपस्थित होते.