This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*कन्नड अभिनेता कीच्च सुदीप यांना मराठी चित्रपटात आणणार : अभिनेता व  निर्माता रितेश देशमुख*

*कन्नड अभिनेता कीच्च सुदीप यांना मराठी चित्रपटात आणणार : अभिनेता व  निर्माता रितेश देशमुख*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कन्नड अभिनेता कीच्च सुदीप यांना मराठी चित्रपटात आणणार : अभिनेता व  निर्माता रितेश देशमुख

बेळगावला मी बऱ्याच वेळा आलोय पण सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.बेळगावच्या लोकांनी आजवर मला भरपूर प्रेम दिले आहे.लई भारी,माऊली आणि वेड चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद बेळगावच्या लोकांनी दिलाय.सध्या बऱ्याच चित्रपटावर काम सुरू आहे.दोन महिन्यात नव्या चित्रपटाची घोषणा करेन अशी माहिती प्रसिध्द अभिनेते आणि चित्रपट निर्माते रितेश देशमुख यांनी दिली.

रितेश आणि जेनेलिया हे बेळगावला गोगटे ग्रुपच्या पिनस अँड लेन्स या प्ले झोनाचे उदघाटन करण्यासाठी आले होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.पिनस अँड लेन्स या प्ले झोनच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या.यावेळी आनंद गोगटे,शिरीष गोगटे,माधव गोगटे आणि मान्यवर निमंत्रित उपस्थित होते.

अन्न ,वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.त्यात आता गेल्या पंधरा वर्षात करमणूक ही एक मूलभूत गरज बनली आहे.गोगटे ग्रुपने पिनस अँड लेन्स प्ले झोन सुरू करून बेळगाव कर जनतेला आणखी एक करमणुकीचे साधन उपलब्ध करून दिले आहे.गोगटे परिवाराने बऱ्याच नवीन गोष्टी शहरात आणल्या आहेत.कॉलेज पासून ते मेरियट हॉटेल पर्यंत गोगटे परिवाराने बऱ्याच नवीन गोष्टी शहरात आणल्या आहेत अशा शब्दात गोगटे कुटुंबीयांचे रितेश देशमुख यांनी कौतुक केले.

जेनेलियाने नुकताच कन्नड चित्रपट पूर्ण केलाय.कन्नड अभिनेता कीच्च सुदीप हा माझा मित्र आहे.मराठी चित्रपटात मी त्याला संधी देणार आहे तर कन्नड चित्रपटात तो मला संधी देणार आहे.हिंदी हाऊसफुल्ल चित्रपटाची घोषणा झाले.प्रत्येक वेळी काही तरी आव्हानात्मक भूमिका असते.आता सध्या एक चित्रपट करतोय तो चॅलेंजिंग चित्रपट आहे.वीस वर्षे झाली कायम स्वताला काही तरी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असतो.नेहमी काही तरी प्रेक्षकांना वेगळे काही तरी देण्याचा माझा अभिनेता आणि निर्माता म्हणून प्रयत्न असतो असेही रितेश यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24