This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

 *राज्यांमध्ये बळकटी निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारीने कार्य पार पाडावे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नूतन बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री जोतिबा चव्हाण-पाटील*  *राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यान आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन: यशस्वी करण्यासाठी बैठक संपन्न*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव, तारीख 10 डिसेंबर 2023 : पुरोगामी चळवळीचा आधारवड लाभलेला आहे. खरंतर महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांच, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ , नामदेव, गाडगे बाबा, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि थोर महामानवाने सांगितलेला संदे, विचार व पुरोगामी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच सर्व सामानांच्या हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आपण प्रयत्न केले गेले पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने सक्रिय होऊन कार्य करण्याची जबाबदारी आपली वाढलेली आहे. पुरोगामी अग्रगण्य महाराष्ट्र , कर्नाटक गोवा यासह इतर देशातील राज्यांमध्ये बळकटी निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करण्याची जबाबदारी पार पडणे महत्त्वाचे आहे.

सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारसरणी मोठ्या प्रमाणात बदलत आहे. १९९१ नंतर भारताचे अर्थकारण बदलले आणि त्याने सामाजिक तसेच राजकीय सांस्कृतिक बदल आणले. हे बदल महाराष्ट्रासाठी अनैसर्गिक असून महाराष्ट्राची विचारसरणीचे पुरोगामित्व अबाधित ठेवल्यास महाराष्ट्राची ओळख कायम राहू शकेल यासाठी प्रत्येकाने कार्य केले गेले पाहिजे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता. इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जुन १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. *असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नूतन बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री जोतिबा पाटील*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने नुकताच विशेष बैठक राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यान आणि विविध कार्यक्रम, व वाढदिवस साजरा करण्या संदर्भात विशेष बैठक रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडली. बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नूतन बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री जोतिबा पाटील होते.

 

स्वागत गौतम कांबळे यांनी केले. प्रास्ताविक दुर्गेश मेत्री यांनी केले. आभार गोपाळ मेलगे यांनी मानले. यावेळी अरुणा साके, रुक्मिणी बल्लारी, निखत सय्यद, शबाना मुल्ला, आप्पाजी सपले, आकाश देसाई, प्रभावती भालेकर, मुनीर लतिफ, चांदणी बागवान, स्वप्नील हिंडलगेकर यासह पक्षाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*बैठकीत मांडण्यात आलेले वेगवेगळे विषय*

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यान आणि विविध कार्यक्रम यशस्वी करण्यात येणार आहे.

वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम, व्याख्याने, कार्यशाळा , महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी आणि इतर विशेष दिनानिमित्त कार्यक्रम राबवून यशस्वी करणे.

यापुढील येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तालुका पंचायत , जिल्हा पंचायत, लोकसभा, विधानसभा यासह इतर निवडणुका लढवण्याचे लक्ष आहे ;ते यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.

शिक्षण , आरोग्य , उद्योग , कला क्रीडा, साहित्य , सांस्कृतिक, दळणवळण , आणि शेतकऱ्यांच्या समस्या , बेरोजगारी व्यसनमुक्ती , अंगविकल – दीव्यांग, गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी अग्रेसर भूमिका घेऊन समस्या सोडविल्या जाणार आहेत. सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देने, विशेष परिश्रम घेऊन होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभाग दर्शवून एकीचे बळ दाखवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होतकरू गरीब विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीचे वाटप केले जाणार आहे.

वर्षभरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक प्रकारचे उपक्रम घेऊन जनजागृती करणे.

शेतकऱ्या शेतकरी अनेक अडचणी मध्ये सापडलेला आहे हातात तोंडाला येणारे पीक जंगली प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे ते रोखण्याकरिता विशेष प्रयत्न केले गेले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून देणे . वन्य प्राण्यांनी शेतामध्ये येऊन पिकामध्ये हैदोस घातल्या आहे तो रोखण्याकरिता वन्य अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावून येणाऱ्या प्राण्यांवर आळा घालण्याकरिता विशेष नियोजन आखून शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचले गेले पाहिजे याकरिता प्रयत्न केले पाहिजेत यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करणार आहोत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now