This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी आणि अन्य भाषेतील होर्डिंग्ज आणि फ्लेक्स फाडून केली मोडतोड*

*कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी आणि अन्य भाषेतील होर्डिंग्ज आणि फ्लेक्स फाडून केली मोडतोड*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी आणि अन्य भाषेतील होर्डिंग्ज आणि फ्लेक्स फाडून मोडतोड केली.शहरात बॅनर,फ्लेक्स आणि होर्डिंग्ज हे फक्त कन्नड भाषेतच लावले पाहिजेत अशी मागणी कन्नड रक्षण वेदिकेने केली आहे.दुपारी बाराच्या सुमारास मूठभर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते कन्नड साहित्य भवन येथून बाहेर पडले.आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,कन्नड कन्नड केवळ कन्नड अशा घोषणा देत ते राणी कित्तुर च अन्न मा चौकात दाखल झाले.

यावेळी चौकात नेहमी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस देखील हजर होते.अचानक कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भिंतीवर आणि होर्डिंग्ज वर चढून इंग्लिश आणि अन्य भाषेतील बॅनर,फ्लेक्स आणि होर्डिंग्ज फाडून मोडतोड केली यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना तेथून पिटाळण्या ऐवजी बघ्याची भूमिका घेतली आणि नंतर त्यांना तेथून हाकलले.चार डिसेंबर पासून बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.

या पार्श्वभूमीवर आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आणि आपणच केवळ कन्नड भाषेचे रक्षणकर्ते आहोत हे दाखवण्यासाठी कन्नड रक्षण वेदिका कार्यकर्त्यांनी स्टंट बाजी करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24