This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*तेलंगणाचे प्रभारी म्हणून आ अभय पाटील यांची नियुक्ती*

*तेलंगणाचे प्रभारी म्हणून आ अभय पाटील यांची नियुक्ती*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : देशातील अठरा राज्यांमधील निवडणूक प्रभारीपदांची यादी भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी जाहीर केली आहे. यामध्ये तेलंगणाचे प्रभारी म्हणून बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांची नियुक्ती केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी प्रभारी नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. १८ ठिकाणच्या प्रभारीपदांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कर्नाटकातून तेलंगणाचे प्रभारी म्हणून आ. अभय पाटील यांची नियुक्ती केली आहे. केरळच्या सहप्रभारीपदी कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांची नियुक्ती केली आहे.

आ. अभय पाटील तेलंगणात जाऊन तेथे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. चारवेळा आमदार बनलेल्या आ. पाटील यांचा अनुभव लक्षात घेऊन तसेच त्यांनी यापूर्वी निवडणूक प्रचारावेळी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. यामुळे निवडणूक होईपर्यंत तेलंगणामधील निवडणुकीसंबंधी सर्व तपशील आ. अभय पाटील हे थेट गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना देणार आहेत. तेलंगणामधील १७ जागांपैकी १० जागा भाजपला मिळतील. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास आ. अभय पाटील यांनी व्यक्त केला आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24