बेंगलोर येथील सुप्रसिद्ध चित्रकार तिरूमला श्रीकांत आणि कुटुंबियातर्फे शांताई वृद्धाश्रमामध्ये आयोजित पेंटिंग कलेवरील कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली.शांताई वृद्धाश्रमामध्ये गेल्या शुक्रवार आणि शनिवारी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी आश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी चित्रकार तिरुमला श्रीकांत यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. म्हैसुरी पारंपारिक पेंटिंग, तंजावर पेंटिंग आणि इतर अन्य पेंटिंग प्रकारातील मातब्बर चित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरूमला यांनी कार्यशाळा आकर्षक पद्धतीने घेतली. जी उपस्थित आश्रमाच्या सदस्यांसाठी माहितीपूर्ण आणि आनंद देणारी ठरली.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शांताई वृद्धाश्रमाचे संचालक वसंत बालिगा, ॲलन विजय मोरे, दिग्विजय तोरगल, सोनिया फ्रान्सिस आणि चर्ली विजय मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.